मिरज/प्रतिनिधी
सुंदरनगर येथे दिनांक २३ फेब्रुवारी रोजी प्रतिक्षा बंगला फोडून अज्ञात चोरट्यानी ४ एल.ई.डी टिव्ही,१ लॅपटॉप,कॅनाॅन कंपनीचा कॅमेरा असा मुद्देमाल चोरून नेला होता.ह्या गुन्ह्याचा तपास हा महात्मा गांधी पोलीस चौक सपोनि रविराज फडणीस ह्यानी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे दिला होता.सदर गुन्ह्याचा तपास हा पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी केला.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच खास बातमीदारामार्फत आरोपींचा सध्याचा ठावठिकाणाची माहिती मिळाली.त्याला तात्काळ जाऊन ताब्यात घेतले.या गुन्ह्यात ४ जण होते.अनिल अल्ताफ सौदागर,वैभव आवळे,नेहाल मोमीन, समर्थ गायकवाड या चौघांनी ही घरफोडी केली असल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या अनिस अल्ताफ सौदागर वय वर्षे २५ राहणार दुर्गानगर कुपवाड यांनी दिली आहे.अनिस सौदागर याला महात्मा गांधी पोलीसांनी अटक केली आहे.तर ३ घे फरारी आहेत.अनिस सौदागर यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे ४ एल.ई.डी टिव्ही,१ लॅपटॉप,१ कॅमेरा आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुंदरनगर मधील झालेली घरफोडी महात्मा गांधी पोलीसांनी आणली उघडकीस..!4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -