मिरज/प्रतिनिधी
मिरज शहरातील गोरगरीब आसरा हीन जनतेला शासनाच्या वतीने म्हाडा योजने अंतर्गत घरे मंजूर करणेत आली आहेत. सदर घरांना म.रा.वि.वि.कं. व महानगरपालिकेच्या वतीने मुलभूत सुख सुविधा माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश असताना. आज रोजी सदर रहिवाशी विज,पाणी, रस्ते, सार्वजनिक स्वच्छता, ड्रेनेज यासारख्या गरजांपासून वंचीत आहेत.सदर च्या मुलभूत गरजांचा हक्क गोरगरिब जनतेस मिळवून देण्यासाठी, आर.पी.आय.(आ.) चे धडाकेबाज युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. अशोकरावजी कांबळे साहेब यांचे अध्यतेखाली म्हाडा कॉलीनीतील रहिवाश्यांना सोबत घेऊन म.रा.वि.वि.कं. मिरज विभाग येथे तिव्र स्वरूपाचे निदर्शने करणेत आली.यावेळी निवेदनाची प्रत विद्युत वितरण कंपनी चे मुख्य अभियंता मा. खांडेकर साहेबांना देणेत आली.
यावेळी मा. खांडेकर साहेबांनी येत्या दोन/तीन दिवसामध्ये म्हाडा कॉलीनीतील रहिवाश्यांना अविरत विज पूरवठा केला जाईल असे आश्वासन दिले. तसेच सा.मि.कु.चे प्रशासकीय अधिकार्यांना सार्वजनीक समस्ये बाबतीत निवेदन देणेत आले. महापालिकेच्या अधिकार्यांनी निवेदनाची त्वरीत दखल घेत झालेली दृव्यवस्थेचे त्वरित निसःरण केले जाईल असा शब्द दिला.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मा. अशोकरावजी कांबळे साहेब म्हणाले, गोर गरीब कष्टकरी जनतेवर होणार्या अन्याया विरूद्ध रिपब्लिकन पक्ष सदैव आवाज उठवतो आहे. संमंधीत जनतेच्या समस्या सार्वजनिक आहेत तरी जबाबदार प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन आमच्या मागण्यांची पूर्तता करावी. येत्या सात दिवसामध्ये सदरच्या समस्या मार्गी लागल्या नाहीत तरी रिपब्लिकन पक्षा च्या वतीने गोरगरीब जनतेला सोबत घेऊन आंदोलनाची तिव्रता वाढवणेत येईल याची दक्षता मिरज शहरातील संमंधीत विभागाने घ्यावी.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते मा. श्वेतपद्म कांबळे, व्ही.जे.एन.टी. आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. सुनिल माने, मराठा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. संतोष जाधव, सोशल मिडीया व आय.टी. सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा सांगली शहर जिल्हा सचिव मा. योगेंद्र कांबळे, सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा. प्रमोद वायदंडे, सांगली शहर जिल्हा सरचिटनीस मा. प्रभाकर नाईक, मिरज शहर अध्यक्ष मा. अविनाश कांबळे, मिरज शहर कार्याध्यक्ष मा. हरिश कोलप, युवक मिरज शहर अध्यक्ष मा. संदिप दरबारे, सांगली शहर जिल्हा संघटक मा. दिपक शिंदे, आर.पी.आय.चे सक्रिय सदस्य मा. नितेश वाघमारे, यांचे सह म्हाडा कॉलनी मिरज येथील महिला, पुरूष मंडळी उपस्थित होते.