अनेकदा रात्री भूक लागणे साहजिक आहे. काही वेळा उशीरा ऑफिसवरुन घरी येणे, रात्रीचे जेवण केल्यावरही मध्यरात्री भूकेमुळे जाग येणे, झोप न लागणे आदी अनेक कारणांमुळे रात्री काही खाण्याची इच्छा होत असते. परंतु अशा वेळी काय खावे हा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. कारण रात्री काही खाल्ले तर पोटात किंवा छातीत जळजळ होण्याची भीती वाटते. शिवाय मध्यरात्री काही खाल्ले तर अपचन होउन पुढचा संपूर्ण दिवस खराब होण्याचाही धोका असतोच. त्यामुळे अनेक जण भूक लागल्यावरही काहीही न खाताच झोपून जात असतात. परंतु असे न करता तुम्ही काही पदार्थ खाउन तुमची लेट नाईट हंगर मिटवू शकतात, व तेही विना काही त्रास होता. या लेखात अशाच काही घटकांची माहिती घेणार आहोत.
1) सुका मेवा
जर तुम्हाला दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी भूक लागली असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही सुका मेवा खाऊ शकता. सुकामेव्यातील काजू, बदाम यांमुळे शरीराला चांगले प्रोटीन मिळत असते. तसेच पचायलाही ते हलके असल्याने याचा वापर तुम्ही लेट नाईट हंगरसाठी करुन शकतात. यात भूक मिटवण्याची चांगली क्षमता असल्याने यापासून तुम्ही चांगली उर्जा निर्माण करु शकतात.
2) फळे
बर्याच लोकांना रात्री उशीरा जेवणानंतरही भूक लागत असते. अशा वेळी तुम्ही फळे खाणे योग्य ठरते. फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. शिवाय हे पचायला हलके असल्याने यातून शरीरावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. फळे खाल्ल्याने भूक भागते. तुम्ही केळी, सफरचंद आदींचा वापर करु शकतात.
3) पनीर
तुम्ही कच्चे पनीरदेखील खाउ शकतात. कच्चे पनीर चवीलाही अप्रतिम असते, त्यामुळे ते कुणालाही अगदी सहज आवडते. तुम्हाला भूक लागली आहे, अन् घरात पनीर असेल तर ते तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकते. पनीरमध्ये भूक शमवण्याची चांगली क्षमता असते. शिवाय यामुळे शरीराला कुठलाही अपाय होत नाही.
4) पॉपकॉर्न
हलके फुलके पॉपकॉर्न प्रत्येकालाच आवडत असतात. रात्रीची भूक शांत करण्यासाठी तुम्ही पॉपकॉर्नची मदत घेऊ शकता. तुम्हाला बाजारात पॉपकॉर्नची पाकिटे सहज उपलब्ध असतात. काही मिनिटांतच ते खाण्यासाठी तयार होत असतात. ते पचायला हलके असल्याने लेट नाईट हंगरसाठी त्याचा समावेश करु शकतात.
5) उकडलेले अंडे
मांसाहार घेत असल्यास उकडलेले अंडे हे अतिशय सकस ठरतात. तुम्ही एक अंड जरी खाल्ले तरी तुमची बरीच भूक मिटण्यास मदत होत असते. उकडलेले अंडे खाल्ल्याने भूक शांत होते आणि त्यात असलेले पोषक तत्व निरोगी राहण्यास मदत करतात. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते.