Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंगPetrol Diesel Price: पुढील आठवड्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होऊ शकेल...

Petrol Diesel Price: पुढील आठवड्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होऊ शकेल वाढ

पुढील आठवड्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकेल. युक्रेन-रशिया युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या सात वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. ज्याचा परिणाम येत्या आठवडाभरात भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही दिसू शकेल. ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार, पुढील आठवड्यात पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दराने प्रति बॅरल   110 डॉलरची पातळी ओलांडली आहे. जेपी मॉर्गनने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पुढील आठवड्यापासून रिटेल डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे, पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही दैनंदिन इंधनाच्या दरात होणारी वाढ पुन्हा सुरू होईल अशी आमची अपेक्षा आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार ? विशेष म्हणजे नोव्हेंबरपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जेपी मॉर्गनच्या मते, ऑइल मार्केटिंग कंपन्याना (OMCs) 5.70 रुपये प्रति लीटर v/s सामान्य मार्जिन रु.2.5/ लीटर नुकसान होते आहे. आम्ही गुंतवणूकदारांना सावध करतो की, कच्चे तेल, डिझेल आणि परकीय चलनातील अस्थिरता पाहता ते दिवसेंदिवस बदलू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -