Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशRussia Ukraine War : गुगलने रशियाच्या नाड्या आवळल्या, बंद केले हे सरकारी...

Russia Ukraine War : गुगलने रशियाच्या नाड्या आवळल्या, बंद केले हे सरकारी मीडिया अॅप

रशिया युक्रेन युद्धाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव टाण्याचा जोरदार प्रयत्न अमेरिकेकडून (Us)होत आहे. मात्र रशिया काही केल्या नरमाईची भूमिका घ्यायला तयार होत नाहीये. त्यामुळे आता अमेरिकेने रशियाची कोंडी करण्याचा घाट घातला आहे. आता गुगलने (Google App) रशियातील अनेक सरकारी मीडिया अॅप बंद केली आहे. त्यामुळे रशियाच्या नाड्या आवळल्या गेल्या आहे. रशियन नागरिकांना आणि सैन्याला याचा मोठा फटका बसत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात गुगलने रशियन मीडिया चॅनेल ब्लॉक केले आहेत. गुगलने ही माहिती दिली आहे. कंपनीने Google Play Store वर RT News आणि Sputnik शी संबंधित मोबाईल अॅप्स ब्लॉक केले आहेत. याआधी यूट्यूबने या दोन्ही माध्यमांशी संबंधित यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती. त्यामुळे रशियाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत.

अनेक टेक कंपन्यांनी सरकारी मीडिया अॅप बंद केले आहेत. गुगलप्रमाणचे अॅप्पलनेही रशियाशी कठोर भूमिका घेतली आहे. अॅप्पलनेही हे चॅनल त्यांच्या प्ले स्टोरवरून हटवले आहेत. हे चॅनल बंद करताना चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणावर RT चे उपसंपादक-इन-चीफ अण्णा बेल्किना यांनी सांगितले की, टेक कंपन्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांच्या मीडिया आउटलेटवर बंदी घातली आहे. मात्र, स्पुतनिकने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गुगलने या दोन्ही न्यूज साइट्सचे अॅप युरोपमधील प्ले स्टोअरवर ब्लॉक केले आहेत.

दुसरीकडे यूट्यूबही यांची अशाच प्रकारे कोंडी करत आहे. YouTube ने जाहिरातींद्वारे त्यांची कमाई थांबवली होती. फेसबुकच्या मेटा कंपनीनेही अशी पावले उचलली आहेत. मेटाने माहिती दिली होती की युरोपीय देशांच्या मागणीनुसार रशियन मीडियाला युरोपमधील त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय गुगलने युक्रेनमध्ये गुगल मॅपचे लाईव्ह ट्रॅफिक फीचर बंद केले आहे. Apple ने Apple Maps चे ट्रॅफिक आणि लाइव्ह घटना दिसण्याचे बंद केले आहे. याशिवाय अॅपलने रशियामध्ये आपल्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली असून अॅपल पेची सेवाही बंद केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -