Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनकंगना राणौतच्या लॉक अपमध्ये करण कुंद्राची एन्ट्री, 'जेलर' बनून स्पर्धकांवर करणार अत्याचार!

कंगना राणौतच्या लॉक अपमध्ये करण कुंद्राची एन्ट्री, ‘जेलर’ बनून स्पर्धकांवर करणार अत्याचार!

कंगना राणौतचा रिअ‍ॅलिटी शो ‘लॉक अप’ सध्या खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. प्रेक्षकांना देखील हा शो खूप आवडला आहे. या शोमध्ये चुरशीची लढत होत असून आतापर्यंत पाच स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता या शोशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आता कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ शोमध्ये एक नवा ट्वीस्ट आला आहे,. त्यानुसार एक जेलरही तुरुंगाच्या आत येणार आहे आणि हा जेलर दुसरा तिसरा कोणी नसून बिग बॉसचा माजी स्पर्धक आहेत. ‘बिग बॉस सीझन 15’ चा सेकंड रनर अप आणि टीव्ही अभिनेता करण कुंद्रा देखील कंगना राणौतच्या नवीन शो लॉकअपचा भाग असणार आहे आणि त्यातील या शोमधील त्याची भूमिका खूप खास असणार आहे.

नुकताच सोशल मीडियावर लॉकअपचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये करण कुंद्रा जेलरच्या भूमिकेत दिसत आहे. लॉकअपच्या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करण कुंद्रा हातात काठी घेऊन कडक पद्धतीने संवाद बोलताना दिसत आहे. समोर आलेल्या या प्रोमोमध्ये ‘शराफत, कोणत्या चिमणीचे नाव आहे हे सर्वजण विसरल्याचे दिसत आहे. सर्व काही आठवण करून देण्याची वेळ आली आहे. मी येतोय… राणीच्या या बॅडे्स तुरुंगात…या सगळ्यांना समोर आणण्यासाठी…खरा अत्याचारी खेळ तर आता सुरु होणार आहे.’ असे म्हणताना करण दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -