Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगHSC Exam 2022 : ऑनलाईन धडे घेतलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांची आज पासून...

HSC Exam 2022 : ऑनलाईन धडे घेतलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांची आज पासून ऑफलाईन परीक्षा, 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरूवात होणार आहे. ही परिक्षा राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार आहेत. कोरोनाच्या काळात दोन वर्ष परीक्षा न झाल्याने गुणवत्ता दर्जा घसरत असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. परंतु आज मात्र ऑनलाईन धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रांवरती कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आज ऑनलाईन धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा देताना मोठी कसरत करावी लागेल असं वाटतंय. 9 हजार 635 केंद्रावर होणार परीक्षा होणार असून 5 आणि 7 मार्चला होणार पेपर मात्र पुढे ढकलण्यात आला असून तो पेपर 5 आणि 7 एप्रिलला होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

मागच्या दोन वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा सवय लागली होती. परंतु गुणवत्ता घसरत असल्याची तक्रार आणि कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आला आहे. परीक्षेच्या केंद्रावरती विद्यार्थ्यांनी वेळेच्या आगोदर पोहचायचं आहे. आज विद्यार्थ्यांचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर असून त्यांना वाढीव वेळ देण्यात आला आहे. कारण दोन वर्षाच्या काळात परीक्षा ऑफलाईन झाल्याने विद्यार्थ्यांचा लिखानाचा सराव कमी असेल. 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी तब्बल पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. आज सुरू झालेली परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरू राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -