कोल्हापूर/ ताजी बातमी
वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूर टिमकडून “माझी चिऊताई” हे अभियान राबविले जात आहे. यासाठी चिऊताई संवर्धनासाठी आपण काय केले याबाबतचा व्हीडीओ व कृती थोडक्यात वर्ल्ड फॉर नेचर यांच्याकडे पाठवावी असे आवाहन वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष अभिजित वाघमोडे यांनी केले आहे.
आपल्या लहानपणी, चिमणीच्या मेणाच्या घराची आणी कावळ्याच्या वाहून गेलेल्या शेणाच्या घराची गोष्ट प्रत्येक आईने आपल्या बाळाला सांगितलेली आहे… ‘एक घास चिऊचा’ व ‘एक घास काऊचा’… असं म्हणत आपल्या चिमुकल्याला प्रत्येक आईने चार घास भरवले आहेत.
चिऊताईची ही पहिली ओळख आईने आपल्याला करून दिली आहे त्यामुळेच की काय, ‘चिमणी’ लहानपणापासून आपल्या हृदयाजवळ असलेला पक्षी आहे. पण आज आपण मोठं झालोय आणी आपली छोटीशी इवलीशी चिऊताई आपल्यापासून दुरावली आहे.
यासाठी वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूर टिमकडून “माझी चिऊताई” हे अभियान राबविले जात आहे. या अभियानात जास्तीतजास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या सर्जनशीलतेचा व वेगवेगळ्या कल्पनांचा वापर करून आपण चिऊताई साठी काय केले आहे?
त्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण काय करतोय?
याची कृती, व्हिडीओ व फोटोसहित थोडक्या शब्दात वर्णन पाठवायचे आहे.
जेणेकरून इतरांना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल व योग्य त्या आवश्यक असणाऱ्या उपाययोजना व कृती करून चिमण्यांची कमी झालेली संख्या वाढण्यास मदत होईल.
असे आवाहन वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष अभिजित वाघमोडे यांनी केले आहे. 9850339373 व 9322309636 या मोबाईल नंबरवर Whatsapp द्वारे हि माहीती पाठवून द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.