Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाश्रीलंकेला जडेजाचा तडाखा, दीडशे धावा फटकावल्‍या

श्रीलंकेला जडेजाचा तडाखा, दीडशे धावा फटकावल्‍या

श्रीलंकेविरुद्‍धच्‍या पहिल्‍या कसाेटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने दमदार फलंदाजी करत शतकी खेळी साकारली. यानंतरही त्‍याने तुफानी खेळी करत १५२ धावा फटकावल्‍या. जडेजाने १६० चेंडूत आपलं शतक पूर्ण केले हाेते. यानंतर पुढील ५० धावा ५१ चेंडूत पूर्ण केले. त्‍याने यापूर्वी टी-२० मालिकेतही धमाकेदार कामगिरी केली होती. यानंतर त्‍याने आपल्‍या खेळीत सातत्‍य ठेवतकसोटीतही तुफानी खेळी केल्‍याने भारताने पहिल्‍या डावात ५०० धावांचा टप्‍पा पार केला आहे.

यापूर्वी 2017-18 मध्‍ये माेहाली मैदानावर रवींद्र जडेजाने ९० धावांची खेळी केली हाेती. मात्र शतकी खेळी साकारण्‍यात त्‍याला अपयश आले हाेते. मात्र आज त्‍याने दमदार खेळीचे प्रदर्शन करत शतकी खेळी करत पहिल्‍या डावात भारताला सुस्‍थितीत नेले. भारताने ८ गडी गमावत ५२७ धावा केल्‍या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -