Monday, July 7, 2025
Homeजरा हटकेलग्‍नाच्या वरातीवर पुष्‍पाची नशा...; श्रीवल्‍ली गाण्यावर चप्पल ओढण्यासाठी उडाली झुंबड

लग्‍नाच्या वरातीवर पुष्‍पाची नशा…; श्रीवल्‍ली गाण्यावर चप्पल ओढण्यासाठी उडाली झुंबड [ व्हिडिओ ]

ताजी बातमी ऑनलाइन टीम
असं वाटतंय की, लोकांच्या डोक्‍यातून अल्‍लू अर्जुनच्या पुष्‍पा (Pushpa) सिनेमाचं खुळ काही अजुनही उतरलेलं नाही. हा चित्रपट जेंव्हा प्रदर्शित झाला तेंव्हापासून या चित्रपटातील गाणी, डायलॉग्‍सनी लोकांच्यावर चांगलीच जादू केली आहे. प्रत्‍येकजण या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्‍सवर रिल्‍स बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. लग्‍न असो की, पार्टी सर्वत्र लोक श्रीवल्‍लीच्या गाण्यावर (Srivalli Song) डान्स करताना दिसत आहेत. त्‍यातच आता सोशल मीडियावर एक अफलातून व्हिडिओ (Funny Video) व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्‍हाला पोट धरून हसावेच लागेल.

लग्‍नाच्या वरातीवर पुष्‍पाची नशा…; श्रीवल्‍ली गाण्यावर चप्पल ओढण्यासाठी उडाली झुंबड [ व्हिडिओ ]



हा व्हिडिओ एका लग्‍नाच्या वरातीचा आहे. ज्‍यामध्ये वरातीतील सर्व लोकं श्रीवल्‍ली गाण्यावर नाचत आहेत. हा डान्स करताना प्रत्‍येकाची अवस्‍था अतीशय वाईट झाली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, अनेक लोकं श्रीवल्‍ली गाण्यावर नाचताना दिसत आहेत. रस्‍त्‍यावर इतक्‍या मोठ्या प्रमाणात लोक एकाच गाण्यावर थिरकताना दिसत असल्‍याने हा लग्‍नाचा व्हिडिओ असावा असे दिसून येते. ही सर्व लोक अल्‍लू अर्जुनच्या डान्स स्‍टेप कॉपी करताना दिसून येत आहेत. यातील काही लोक फ्लॉवर समझे क्‍या या डायलॉगवरही ॲक्‍शन करताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -