पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे मेट्रोचे उदघाटन केले जाणार आहे. त्यासाठी मोदी पुणे येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता पंतप्रधान पुणे येथे दाखल झाले. यावेळी त्याच्या हस्ते महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.