उपमुख्यमंत्री हे त्यांच्या डॅशिंग कृतीमुळे अधिक चर्चेत असतात नुकतेच त्यांनी एका अधिका-याला काम का झाले नाही, तसेच ते का होत नाही असं सगळ्यांसमोर फोन लावून चांगलेचं झापल्याचे पाहायला मिळाले आहे. पुण्यात अनेक कार्यकर्त्यांची तक्रारी आल्याने अजित पवारांनी थेट अधिका-यांना सर्वांनसमोर फोन लावला. त्यावेळी त्यांनी त्या अधिका-याला जाब विचारल झापल्याची चर्चा आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तो स्टेटसला देखील ठेवला आहे. त्यामुळे अजित पवारांची पुन्हा एकदा पुण्यात चर्चा सुरू झाली. पुणे महापालिकेच्या तोंडावर अजित पवारांनी अनेक कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या समस्या देखील ते जाणून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पुण्यात महापालिकेच्या पाश्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी आपली कंबर कसायला सुरूवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेत आपली सत्ता असावी अशा अनेक पक्षांनी तिथल्या नेत्यांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तिथल्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या तोंडावर अजित पवारांनी मागच्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी भेट द्यायला सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या कानावर काम झाले नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांनी चक्क एका अधिका-याला फोन लावला ते काम का नाही केलं असा जाब विचारला. तसेच ज्या अधिका-यांनी ते काम केल नसेल त्याला त्याला करायला सांगा अशी सुचना देखील दिली. तसेच मला ते करून पाहिजे असं देखील अजित पवार व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
आतापर्यंत अजित पवारांनी त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये अनेकदा अधिका-यांना खडसावलं असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे त्यांनी एखाद्या अधिका-याला खडसावल्यानंतर त्याची राजकीय चर्चा अधिक होते. तसेच त्यांची अधिका-यांकडून काम करून घ्यायची पध्दत वेगळी असल्याने त्यांच्याकडून अनेकदा अधिका-यांना जाब विचारल्याचं पाहायला मिळतं.