पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध केला आहे. आज सकाळी अलका चौकात काळे झेंडे घेऊन काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. तसेच राष्ट्रवादीकडूनही आंदोलन करण्यात आले. मोदींनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसने हे आंदोलन केले आहे. अलका चौकात काळे झेंडे घेऊन काँग्रेस आक्रमक झाली आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला राष्ट्रवादी, काँग्रेसचा विरोध केला आहे. कार्यकर्त्यांची निदर्शने केलीत. दरम्यान, मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कर्वे रस्त्यावर दुकाने बंद करण्यात आली आहे. पंतप्रधान या मार्गाने मेट्रोद्वारे प्रवास करणार असल्याने दुकाने बंद करण्यात आली आहेत. दरम्यान मोदींच्या दौऱ्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आंदोलन सुरू केले आहे. पुण्यातील अलका चौकात काँग्रेसचे तर पुणे रेल्वे स्थानका समोर राष्ट्रवादीच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला.
तसेच पर्स, बॅग, पाणी बॉटल, लॅपटॉप आदी वस्तू सभास्थळी आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. काळे कपडे किंवा काळा मास्क यावर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. मोदी पुण्यात दाखल झाले आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोसह विविध विकासकामांचं उदघाटन, भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. महापालिका निवडणूक पुढील महिन्यात असल्याने भाजप या निमित्ताने मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.