बॉलिवूडची मस्तानी आणि आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ‘गेहराइयां’ चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझोन प्राईमवर प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे दीपिका पादुकोण चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचे जोरदार कौतुकही होत आहे. गेहराइयांनंतर आता दीपिका पादुकोण तिच्या आगमी चित्रपटाच्या तयारीला लागली आहे.
दीपिका पादुकोण तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा किंग खान अर्थात शाहरुख खानसोबत काम करणार आहे. पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत ती दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग स्पेनमध्ये होणार आहे. या शूटिंगसाठी दीपिका पादुकोण ही शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत स्पेनला रवाना झाली. यावेळी अभिनेत्रीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. दीपिकाचा एअरपोर्ट लूक पाहून सर्वजण थक्क झाले. दीपिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ती ट्रोल होत आहे.
दीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यान तिने रेड कलरचा टर्टल नेक टी-शर्ट आणि लेदर पॅंट घातली होती. तिने डोक्यावर कॅप सुद्धा घातली होती. दीपिकाचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिचा हा लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला. दीपिकाचा फॅशन सेन्सवरुन ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. नेटिझन्सनी दीपिकाची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.
विरल भयानीने दीपिकाचा एअरपोर्ट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावरुन नेटिझन्सने तिला ट्रोल करत कमेंट करून अभिनेत्रीची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिले – ‘ही रणवीर सिंग झाली आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले – ‘आता रणवीर सिंगचा प्रभाव यायला हवा होता’. दुसर्याने लिहिले – ‘तिची स्टायलिस्ट कोण आहे?’ तर आणखी एका युजरने – ‘झोमॅटो गर्ल.’ असे लिहिले आहे. सोशल मीडिया युजर्स व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स देत आहेत.