Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगइंग्रजीचा पेपर कठीण गेल्यानं जीव दिला! गळफास घेत 12वीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

इंग्रजीचा पेपर कठीण गेल्यानं जीव दिला! गळफास घेत 12वीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रत्नागिरीत (Ratnagiri) एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच बारावीचा पेपर कठीण गेला, म्हणून एक विद्यार्थीनीनं आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. चार मार्च रोजी इंग्रजीचा पेपर झाला होता. या पेपरनंतर विद्यार्थीनी प्रचंड तणावाखाली होती. याच तणावामुळे तिनं गळफास (Suicide) घेत आपला जीव दिला असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही विद्यार्थीनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये ऍक्टीव्ह होती. समाज प्रबोधनासाठी लेक वाचवा, लेक जगवा असा संदेशही ही बारावीतील विद्यार्थीनी देत होते. इतकंच काय तर गडकिल्ले सर करण्याची देखील या विद्यार्थीनीला होती. दरम्यान, या विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्यानं तिच्या कुटुंबीयांनाही धक्का बसलाय. शनिवारी सकाळी गळफास घेत या तरुणीनं आपलं आयुष्य संपवलंय.



कळलं कसं?
आत्महत्या केलेल्या बारावीतील विद्यार्थीनीचं नाव वैष्णवी श्रीनाथ असं आहे. ही विद्यार्थीनी रत्नागिरीच्या संकल्पनगर इथं आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. शुक्रवारी (4 मार्च) रोजी बारावीचा इंग्रजी पेपर देऊ आल्यापासून वैष्णवी अस्वस्थ होती. पेपर कठीण गेल्यामुळे आता काय करायचं, असा प्रश्न तिला पडला होता.

वैष्णवीच्या वडिलांचा रत्नागिरीत भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी तिचे वडील दुकानात मुलासोबत निघून गेले होते. संकल्पनगरच्या कारवांची वाडी इथं राहणारी वैष्णवी आपल्या आईसोबत घरातच होती. अभ्यास करण्यासाठी जाते असं सांगून वैष्णवी एका खोलीत गेली. बराच वेळ झाला तरी अजून वैष्णवी बाहेर कशी आली नाही, असा प्रश्न तिच्या आईला पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -