Wednesday, July 23, 2025
Homeक्रीडाIND vs PAK Womens World Cup 2022: भारतीय महिला संघाचा दिमाखदार विजय,...

IND vs PAK Womens World Cup 2022: भारतीय महिला संघाचा दिमाखदार विजय, पाकिस्तानला 107 धावांनी चारली धूळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारत आणि पाकिस्तान (INDW vs PAKW) यांच्यात खेळल्या गेलेल्या महिला विश्वचषक-2022 मधील चौथ्या सामन्यात भारताने 107 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयात राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad), स्नेह राणा (Sneh Rana) आणि पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) आणि स्मृती मानधना (Smriti Mandhana) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताचा पाकिस्तानवरचा हा सलग 11वा एकदिवसीय विजय आहे. वनडे फॉरमॅटमध्ये पाकिस्तानला टीम इंडियावर कधीही विजय मिळवता आलेला नाही.



स्नेह, पूजा स्मृतीने ठोकले अर्धशतक
एकदिवसीय विश्वचषकात मंधानाने पाकिस्तानविरुद्ध पहिले अर्धशतक झळकावले. तिने 75 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. तर स्नेह राणाने 48 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. पूजा वस्त्राकरने 59 चेंडूत 67 धावां केल्या.


भारताची खराब सुरुवात
माउंट माउंगानुईच्या बे ओव्हलवर (Bay Oval, Mount Maunganui) नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित षटकांत 7 गडी गमावून 244 धावा केल्या. भारताची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात शेफाली वर्माच्या रूपाने संघाला मोठा धक्का बसला. शेफालीला 6 चेंडूत खातेही उघडता आले नाही.मात्र यानंतर स्मृती मानधनाने दीप्ती शर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. दीप्ती 57 चेंडूत 40 धावा करून बाद झाली. त्यानंतर काही वेळातच स्मृती मंधाना देखील अनमच्या चेंडूवर बाद झाली.

स्नेह राणा-पूजा वस्त्राकरची ऐतिहासिक भागीदारी
भारताने 114 धावांपर्यंत 6 विकेट गमावल्या होत्या. परंतु स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांनी 122 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. स्नेह राणाने 48 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केल तर पूजाने 67 धावां केल्या. पाकिस्तानकडून निदा दार आणि नशरा संधू यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

पाकिस्तान 137 धावांत गारद
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 43 षटकांत केवळ 137 धावांपर्यंत मजल मारू शकला. पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने सर्वाधिक 30, तर डायना बेगने 24 धावा केल्या. याशिवाय फातिमा सनाने 17 आणि कर्णधार बिस्माह मारूफने 15 धावा केल्या. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने 4 बळी घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -