Sunday, February 23, 2025
Homeजरा हटकेInternational Women's Day 2022: कधी आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन? जाणून घ्या इतिहास...

International Women’s Day 2022: कधी आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

ताजी बातमी ऑनलाईन टीम
दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day) साजरा केला जातो. मार्च महिना हा जगभरात ‘महिला इतिहास महिना’ म्हणून ओळखला जातो. या महिन्यात महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक यशाचा उत्सव साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी महिलांबद्दलच्या भेदभावाच्या रूढी आणि परांपरांपासून मुक्त होण्याचे आवाहन (International Women’s Day Special) केले जाते. हा दिवस का साजरा केला जातो तसेच त्याच्या इतिहास आणि महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. तसेच या वर्षाची थीम काय आहे हे देखील जाणून घेऊया…



आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास (International Women’s Day History)
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनुसार विसाव्या शतकात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींच्या क्रियाकलापांमधून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय झाला. तर UNESCO नुसार राष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा 28 फेब्रुवारी 1909 रोजी अमेरिकेत साजरा करण्यात आला. जो सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने न्यू यॉर्कमध्ये गारमेंट कामगार महिलांनी कठोर कामाविरुद्ध निषेध व्यक्त करत पुकारलेल्या संपाच्या सन्मानार्थ साजरा केला. तसेच 1917 मध्ये रशियातील महिलांनी ‘ब्रेड अँड पीस’ या घोषणेसह निषेध आणि संप करण्यासाठी फेब्रुवारीचा शेवटचा रविवार (जो ग्रेगोरियन कॅलेंडरवर 8 मार्च रोजी येतो) निवडला. त्यांच्या चळवळीमुळे अखेरीस रशियामध्ये महिलांच्या मताधिकाराची

1945 साली युनायटेड नेशन्सचा चार्टर महिला आणि पुरुष यांच्यातील समानतेच्या तत्त्वाला मान्यता देणारा पहिला आंतरराष्ट्रीय करार बनला. परंतु 1975 मध्ये 8 मार्च रोजी संयुक्त राष्ट्र संघाने पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. नंतर डिसेंबर 1977 मध्ये, महासभेने एक ठराव मंजूर केला. त्यानुसार सदस्य राष्ट्रांद्वारे त्यांच्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय परंपरेनुसार वर्षातील कोणत्याही दिवशी महिला हक्क आणि आंतरराष्ट्रीय शांततेसाठी संयुक्त राष्ट दिनाची (United Nations Day for Women’s Rights and International Peace) घोषणा केली. त्यानंतर 1977 मध्ये युनायटेड नेशन्सने मान्य केल्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन एक जागतिक पातळीवर सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि सदस्य देशांना 8 मार्च हा महिला हक्क आणि जागतिक शांततेसाठी अधिकृत सुट्टी म्हणून घोषित करण्याचे आवाहन करण्यात आले.

युनेस्कोनुसार आंतरराष्ट्रीय महिला दिन हा लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने झालेल्या प्रगतीचा उत्सव साजरा करण्याचा एक प्रसंग आहे. परंतु त्या उपलब्धींवर गंभीरपणे विचार करण्याची आणि जगभरातील लैंगिक समानतेच्या दिशेने अधिक गतीसाठी प्रयत्न करण्याचा प्रसंग देखील आहे. महिलांच्या असाधारण कर्तुत्त्वांना ओळखण्याचा आणि जगभरातील लैंगिक समानता वाढवण्यासाठी एकसंघ शक्ती म्हणून एकत्र उभे राहण्याचा हा दिवस आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -