ताजी बातमी ऑनलाईन टीम
हिवाळा संपला असून आता उन्हाळ्याला देखील सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यामध्ये त्वेचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात (Summer) त्वचेची विशेष काळजी घेणे खूपच गरजेचे असते. तीव्र उष्णता आणि घामामुळे आपली त्वचा खूपच निस्तेज होते. या काळात ब्लॅकहेड्स (Blackheads), टॅनिंग (Tanning), मुरुम (pimples ) आणि पिग्मेंटेशन (Pigmentation) यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्येपासून सुटका करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करु शकता.
आपल्या स्वयंपाक घरामध्ये वापरण्यात येणारा रवा हा आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील खूपच फायदेशीर आहे. रव्याचा वापर करुन तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला रव्यापासून स्क्रब (suji face scrub) कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. या फेस स्क्रबचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. याचा वापर केला तर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये बरेच बदल दिसून येतील. जाणून घ्या रव्याचा फेस स्क्रब कसा तयार करायचा…
रव्याच्या फेस स्क्रबसाठी साहित्य –
रवा – चार चमचे
दही – तीन चमचे
मूग डाळीची पेस्ट – एक चमचा
गुलाब जल – एक चमचा
असा तयार करा फेस स्क्रब –
– सर्वात आधी तुम्ही एका वाटीमध्ये रवा घ्या. यामध्ये दही मिक्स करा आणि पाच मिनिटं हे मिश्रण असेच ठेवा.
– या मिश्रणात मूग डाळीची पेस्ट आणि गुलाब जल मिक्स करा.
– हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्या. अशापद्धतीने तुमचा रव्याचा फेस स्क्रब तयार होईल.
असा करा फेस स्क्रबचा वापर –
– फेस स्क्रब चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
– चेहऱ्यावर स्क्रब लावा. हलक्या हाताने चेहऱ्यावर व्यस्थित स्क्रब करा.
– 15 मिनिटं चेहऱ्यावर स्क्रब तसाच लावून ठेवा.
– 15 मिनिटानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.