Sunday, December 22, 2024
Homeसांगलीसांगली : रायफल शुटींग स्पर्धा निकाल जाहिर

सांगली : रायफल शुटींग स्पर्धा निकाल जाहिर

मिरज/ प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र रायफल शुटींग क्लब, शांतिनिकेतनच्यावतीने खुल्या राज्यस्तरीय रायफल शुटींग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कोरोना परिस्थितीमुळे गेली दोन वर्षे या स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या, पण यंदा मात्र या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. राज्यातील 700 पेक्षाही जास्त नामवंत शुटर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. एअर रायफल, एअर पिस्टल, 0.22 रायफल, 12 बोअर गन, रिव्हॉल्वर/पिस्टल, एन.पी.बोअर रायफल या विभागात या स्पर्धा पार पडल्या. महिला स्पर्धकांचा सहभागही लक्षणीय होता. विजय रोकडे व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष गौतम पाटील, चिटणीस नौशाद शिकलगार, कार्याध्यक्ष राजू वडर आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -