ताजी बातमी ऑनलाईन टीम
निलजी-बामणी हद्दीतून गेलेल्या रेल्वे पटरीवर निलजी येथे
राहणारा अक्षय दीपक घाडगे (वय २४) या युवकाने रेल्वेसमोर झोकून आत्महत्या केली. त्याच्याजवळ मी आत्महत्या करीत असून कोणास दोषी धरू नये असा मजकूर असलेली चिठ्ठी मिरज ग्रामीण पोलिसांना आढळुन आली आहे.अक्षय हा पेंटीग व्यवसायिक होता.
सकाळी तो कोणास न सांगता बाहेर गेला होता. दुपारी ३ वा.सुमारास निलजी-बामणी हद्दीतून जाणाऱ्या रेल्वे पटरीवर एका युवकाचा मृतदेह आढळला. तपास सुरू असताना पोलिसांना मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये मी स्वखुशीने आत्महत्या करीत असून माझ्या आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये असे असे लिहिले होते. तपासाअंती तो मृतदेह बामणी येथील अक्षय दीपक घाडगे याचा असल्याचे समजले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.