Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरसांगली कोल्हापूर मार्गावर अपघात : दोघे जागीच ठार

सांगली कोल्हापूर मार्गावर अपघात : दोघे जागीच ठार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली : कोल्हापूर मार्गावर मालेफाटया नजीक भाजी विक्रेती वृध्द महिला मोटार सायकल व स्कुल बस अशा झालेल्या तिहेरी अपघातात दोन सिव्हिल इजिंनियर युवकांचा अपघाती मृत्यू झाला शितल बाळासो पाटील (वय २४, रा.हरोली ता. शिरोळ) व सुरज श्रीकांत शिंदे (वय २३,रा. चंदूर ता. हातकणंगले)

अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोन युवकांची नावे असून जखमी वृध्द महिलेला उपचारासाठी कोल्हापूरला नेल्याने नाव समजू
शकले नाही. या अपघाताची | माहीती मिळताच हरोली व चंदूर
या गावा मध्ये शोककळा पसरली आहे. यामधील सुरज श्रीकांत शिंदे याचा दहा दिवसापुर्वी साखरपुडा झाला होता असे समजते.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी हे दोघे दुपारच्या सुमारास होंडा शाईन मोटार सायकल क्र. (एम.एच.०९ ईसी११०९) वरून कोल्हापूर जिल्हा परिषदेतील मिटींगला जात होते.



माले फाटयानजीक एक भाजी विक्रेती वृध्द महिला अचानक आडवी आल्याने तिला मोटार सायकलची धडक बसली त्यांचा यामुळे गाडीवरचा ताबा सुटला. दरम्यान पाठी मागून येत असलेल्या स्कूल बसने त्याना धडक दिली यामुळे दोघेही डांबरी रस्त्यावर जोराने आपटले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्या दोघांचा जागीच मुत्यु झाला. तर या अपघातात एक वध्द महिला गंभीर जखमी झाली असुन तिच्यावर कोल्हापुरातील एका रुग्नालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली असून अधिक तपास सपोनि उपराटे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -