ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर येथील जाधववाडीमधील वृद्ध दाम्पत्याने आजाराला कंटाळून रंकाळा तलावात उडी टाकून आत्महत्या केली. धोंडिराम बळवंत पाटील (वय 80) व विजयमाला धोंडिराम पाटील (76, रा. जाधववाडी) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीला आला. पती-पत्नीने एकाचवेळी जीवनयात्रा संपविल्याने जाधववाडीत शोककळा पसरली आहे.
दाम्पत्याला दोन मुले व एक मुलगी आहे. 2008 मध्ये महाडिक कॉलनी कोल्हापूर येथील घराची विक्री केल्यानंतर पती-पत्नी जाधववाडी परिसरात भाड्याची खोली घेऊन स्वतंत्र राहत होते. आजारपणामुळे मुलांनी आई, वडिलांना घरी नेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी नकार दिला. मात्र, काही महिन्यांपासून आजारपणामुळे दोघेही नैराश्यात होते.
शनिवारी (दि. 5) दुपारी पती-पत्नीने रंकाळा तलावात उडी टाकून आत्महत्या केली. रविवारी (दि. 6) सायंकाळी अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला होता. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती