Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीमुख्यमंत्री ममता बॅनर्जी भीषण अपघातातून थोडक्यात बचावल्या

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भीषण अपघातातून थोडक्यात बचावल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी भीषण अपघातातून थोडक्यात बचावल्या. परंतु ममतादीदींची  पाठ आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताबाबत स्वत: ममतादीदींनी माहिती दिली. ममतादीदींच्या चार्टर्ड विमानासमोर अचानक एक दुसरे विमान आले होते. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखून क्षणाचा विलंब न करता विमान बाजुला केले. सुदैवाने मोठा अपघात टळला. या घटनेनंतर राज्य सरकारने याप्रकरणी डीजीसीएला चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनेबाबत सांगितले, आमच्या चार्टर्ड विमानासमोर अचानक दुसरे विमान आले. आकाशात समोरासमोर दोन्ही विमानांची टक्कर झाली असती. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवून आमचे विमाण 6000 फूट खाली उतरवले. सुदैवाने मोठा अपघात टळला. पण माझी पाठ आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. मला खूप त्रास होत आहे.

या घटनेनंतर वैमानिकाने विमान नेताजी सुभाषचंद्र आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. या घटनेमुळे ममतादीदींना गंभीर दुखापत झाली आहे. परंतु त्या ठीक असून काळजी करून नये, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी ममतादीदींनी घटनेबाबत माहिती देखील दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -