Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानफक्त 15498 रुपयांत मिळतोय iPhone, जाणून घ्या काय आहे ऑफर?

फक्त 15498 रुपयांत मिळतोय iPhone, जाणून घ्या काय आहे ऑफर?

स्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर आहे. Apple चा मोस्ट अफोर्डेबल डिव्हाइस iPhone SE (2020) निम्म्यापेक्षा कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. जागतिक महिला दिनी तुम्ही तुमची आई, पत्नी, बहीण, प्रियसी आणि मैत्रिणीला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर iPhone SE (2020) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

iPhone SE (2020) हा स्मार्टफोन आकर्षक किमतीत उपलब्ध आहे. ई-कॉमर्स साईट Flipkart वर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे 8 मार्चला जागतिक महिला दिनी Apple आपला स्वस्त डिव्हाइस iPhone SE 3 लॉन्च करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कसा मिळवू शकतात iPhone SE

Flipkart वर iPhone SE (2020) च्या 64GB मॉडलची किंमत 30298 रुपये आहे.  परंतु हा स्मार्टफोन केवळ 15498 रुपयांत खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला फोनसोबत एक्सचेंज ऑफरचा लाभ उठवू शकतात. या डिव्हाइसवर 14880 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. ही डिस्काउंट ऑफर तुमच्या जुन्या स्मार्टफोनचा मॉडल नंबर आणि कंडीशनवर अवलंबून असेल. एक्सचेंज ऑफरनंतर तुम्ही iPhone SE (2020) केवळ 15498 रुपयांत खरेदी करू शकतात. इतकेच नाही तर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला अतिरिक्त 5 टक्के कॅशबॅक देखील मिळवू शकतात.

iPhone SE (2020) चे स्पेसिफिकेशन्स
– iPhone SE (2020) मध्ये 4.7 इंचाचा रेटिना एचडी डिस्प्ले
– स्क्रीन रेझोल्यूशन 750×1,334 पिक्सल
– डिव्हाइस 750×1,334 प्रोसेसरवर काम करते
– Apple चे A13 Bionic chip वर आधारित
– 12MP चा रियर कॅमेरा
– optical image stabilization (OIS) सपोर्ट आणि 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग क्षमता
– व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यूजर्स 7MP चा फ्रंट कॅमरे
– फास्ट चार्जिंग सपोर्ट

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -