मिरज / प्रतिनिधी
मिरज शहर परिवर्तन समितीच्यावतीने आरोग्य शिबीर घेऊन व जिजाऊ चरित्राचे वाटप करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात परिवर्तन समितीच्या वतीने आज महापालीकेच्या महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य शिबीर घेण्यात आले. कृपा आय केअर कडून नेत्र तपासणी, भारती विद्यापिठ कडून फिजीओ थेरपीचे मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त नितीन कापडनीस , महापौर दिग्विजय सुर्यवंशी, महिला व बालकल्यान सभापती सौ. गितांजली ढोपे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
यावेळी सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्ष नेते संजय मेंढे, गजेंद्र कुळ्ळोळी, उपायुक्त आडके. प्रामुख्याने उपस्थित होते. तपासणीसाठी आलेल्या सर्व महिलांना जिजाऊ चरित्र व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. परिवर्तन समितीच्या सौ. गितांजली पाटील, सौ सुनिता कोकाटे, सौ जमादार, ॲड. बिलकीस बुजरूक, सौ रूपाली गाडवे, सौ. अनिता हारगे, सौ साधना माळी या माहिला पदाधीकार्यांनी आयोजीत केला होता.
यावेळी मुस्तफा बुजरूक, संतोष माने, सचीन गाडवे, धनंजय हलकर, सुधीर गोखले, मंदार वसगडेकर, बाळासाहेब पाटील, महापालीकेच्या आधीकारी कांबळे मॕडम, si सय्याम मॕडम, नितीन कांबळे, साबळे साहेब, व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.