ताजी बातमी ऑनलाइन टीम
आयपीएल मध्ये काही बदल करण्यात आले आहेत त्यानुसार या 2022 मध्ये आयपीएल मध्ये विराट कोहली हा कुठल्या टीमचा कर्णधार होणार आहे .आयपीएल हंगामाला २६ मार्चपासून सुरूवात होणार आहे आणि त्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार आहे.
यावेळी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस आरसीबीचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहेत, पण फ्रँचायझीने डु प्लेसिसला संघाचा नवा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा आहे. आरसीबी आता १२ मार्च रोजी अधिकृत घोषणा करणार आहे. त्याच दिवशी संघ आपली नवी जर्सीही लाँच करणार असल्याचे समजते.
इनसाइड स्पोर्टने(sports) सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, आरसीबी कर्णधाराची १२ मार्च रोजी घोषणा करण्यात येणार आहे. आरसीबीचा भावी कर्णधार कोण, हे त्याच दिवशी कळेल, असे सूत्रांनी सांगितले. ही एक कठीण निवड आहे. १२ मार्चला दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत आरसीबी त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा करेल. नव्या कर्णधाराच्या नावासह नवी जर्सीही यावेळी लाँच करण्यात येईल. आयपीएल २०२२ च्या पहिल्या तीन सामन्यांसाठी मॅक्सवेल उपलब्ध नसेल, असे मानले जात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सर्व केंद्रीय कंत्राटी खेळाडूंना ५ एप्रिलपर्यंत आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू ६ एप्रिलपासून आयपीएल २०२२ मध्ये सहभागी होतील.
व्हिटोरीने दिले अपडेट
आरसीबी संघाची कमान फाफकडे सोपवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विश्वचषकासह तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव फाफकडे आहे. आरसीबीच्या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा सर्वाधिक अनुभव असणारा विराट कोहलीनंतर तो एकमेव खेळाडू आहे.