ताजी बातमी ऑनलाइन टीम
पुण्यातील धनकवडी परिसरामध्ये एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शुल्लक कारणावरून मित्राने मित्राला पेट्रोल टाकून पेटवून दिल आहे. या दुर्घटनेत सुरज मरळ हा 28 वर्षाचा युवक गंभीररीत्या (roast) भाजून जखमी झाला आहे.
धनकवडीच्या समशान भूमी परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सुरज विजय मरळ हा घरून रेडिमेट कपडे विकण्याचे काम करतो. सात तारखेला मध्यरात्री सुरज आपला मित्र गोविंदा उर्फ सत्येंद्र प्रमोद कुमार यादव यांच्या सोबत दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिऊन झाल्यानंतर सुरज आणि गोविंदा धनकवडी जवळील स्मशान भूमी या ठिकाणी आपसात चर्चा करत होते.
बातचीत करत असतानाच दोघांमघ्ये अचानक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की गोविंदा उर्फ सत्येंद्र प्रमोद कुमार यादवने सुरज मरळच्या डोक्यात आधी सिमेंटचा ब्लॉक घातला. त्यानंतर त्याने बाटलीतून आणलेलं पेट्रोल सूरजच्या अंगावर टाकून त्याला पेटवून दिलं. या घटनेत सुरज मरळ हा जवळपास तीस टक्के भाजला (roast) असून, त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.