Friday, March 14, 2025
Homeतंत्रज्ञानएअरटेल कंपनीची यूजर्संना मोठी भेट, मोबाईल रिचार्जवर मिळणार 25 टक्के सूट

एअरटेल कंपनीची यूजर्संना मोठी भेट, मोबाईल रिचार्जवर मिळणार 25 टक्के सूट

ताजी बातमी ऑनलाइन टीम

देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने नुकतेच अॅक्सिस बँकेसोबत मिळून क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. याला ‘Airtel Axis Bank Credit Card‘ असे नाव देण्यात आले असून या कार्डच्या मदतीने वापरकर्त्यांना अनेक विशेष फायदे मिळू शकतील. कंपनीच्या या विशेष सुविधेचा (Airtel Offer) लाभ देशातील 340 दशलक्ष म्हणजेच सुमारे 34 कोटी वापरकर्त्यांना मिळणार आहे. या क्रेडिट कार्डच्या मदतीने वापरकर्ते रिचार्ज (Airtel Plans) आणि बिल पेमेंटवर सवलत मिळवण्याबरोबरच इन्स्टंट लोन देखील घेऊ शकतात. चला जाणून घेऊया Airtel Axis Bank क्रेडिट कार्डमुळे मिळणाऱ्या फायद्यांविषयी तपशीलवार माहिती



मिळेल 25 टक्के सूट
Airtel Axis Bank Credit Card वर वापरकर्त्यांना बिल पेमेंट आणि मोबाइल रिचार्जवर 25 टक्के सूट मिळेल. ही सवलत वापरकर्ते Airtel DTH, Airtel Extreme Fiber किंवा Airtel Black वर देखील मिळवू शकतात.

मिळवा आणखी बरेच फायदे
Airtel Axis Bank Credit Card मध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल सांगायचे झाल्यास तुम्ही Zomato, Swiggy आणि BigBasket वरून या कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. याशिवाय एअरटेल थँक्स अॅपद्वारे वीज, पाणी आणि गॅस बिल भरण्यासाठी एअरटेल अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Airtel Axis Bank Credit Card) वापरल्यास 10 टक्के कॅशबॅकचा देखील लाभ मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -