Sunday, July 27, 2025
Homeमनोरंजनझुंड पाहिल्यानंतर भारावलेल्या आमीर खानच्या वक्तव्यान अमिताभ बच्चन यांनी काय म्हटलं?

झुंड पाहिल्यानंतर भारावलेल्या आमीर खानच्या वक्तव्यान अमिताभ बच्चन यांनी काय म्हटलं?

महानायक अमिताभ बच्चन यांचा एखादा चित्रपट असेल आणि तो चर्चेत नसेल, असं कधी घडतच नाही. अमिताभ हल्ली अनेक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रत्येक चित्रपटाची कथा ही आधीच्या चित्रपटापेक्षा पूर्णपणे वेगळी असते आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पूर्ण जबाबदारी आत्तापर्यंत अमिताभ बच्चन यांनी घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वीच झुंड हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हल्ली सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेला आहे. मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हा चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे आणि या चित्रपटाने सर्व स्तरातून कौतुक देखील मिळवलेले आहे.

एअरटेल कंपनीची यूजर्संना मोठी भेट, मोबाईल रिचार्जवर मिळणार 25 टक्के सूट

आधी ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट सैराट नंतर आता थेट हिंदी सिनेमा नागराज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी एका फुटबॉल कोच ची भूमिका साकारली आहे नुकतेच आमिर खान ने या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले होते.

आमिर खान हा चित्रपट पाहायला आल्यानंतर आमिर खान खूपच भावूक झाला होता. अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या भूमिकेबद्दल आमिर खान ने खूपच कौतुक केले होते. आणि आता अमिताभ बच्चन यांनी आमिर खान यांच्या भावनिक विधानावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा आपल्या समृद्ध अभिनय शैलीने सर्वांना प्रभावित केले आहे.त्याचा “झुंड” हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार पसंती देखील दिलेली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पूर्वी निर्मात्यांनी आमिर खान यांच्यासाठी एक स्पेशल स्क्रीनिंग होस्ट केली होती. चित्रपट पाहिल्यानंतर आमीर खान यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. आमिर खूपच भावूक झाला होता. अमिताभ यांच्या अनेक महान चित्रपटातील एक चित्रपट असे वक्तव्य करून या चित्रपटाबद्दल कौतुक केले. हा चित्रपट पाहिल्यानंतर आमिर खान यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना म्हटले की, माझ्याकडे शब्दच नाही… या चित्रपटातून भारताच्या असंख्य लोकांच्या भावना तुम्ही लोकांसमोर मांडल्या आहेत आणि या भावना अविश्वसनीय आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -