Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगनीट परीक्षेसाठीची वयाची मर्यादा हटवली, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

नीट परीक्षेसाठीची वयाची मर्यादा हटवली, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

नीटची परिक्षा  देण्याची तयारी करणाऱ्या आणि परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  नीट परीक्षेच्या वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयने नीट परीक्षेसाठीची वयाची मर्यादा हटवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना  मोठा दिलासा मिळाला आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ‘नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट’  परीक्षेसाठी यावर्षीपासून जनरल कॅटगरीसाठीची 25 वर्षे ही कमाल वयोमर्यादा आणि राखीव प्रवर्गासाठीची 30 वर्षाची वयोमर्यादा हटवण्यात आली आहे. नीट परीक्षेसाठी परीक्षार्थीचे किमान वय 17 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच ही परीक्षा वयाची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंतच देता येईल, असा पूर्वी नियम होता. मात्र आता या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही वयोमर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

अ’ राखीव प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आणि जनरल प्रवर्गासाठी 25 वर्षे होती. यापुढे नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वयाची मर्यादा नसणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचसोबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. डॉ. पुलकेश कुमार यांनी सांगितले की, ‘एनएमसीच्या चौथ्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. नीट यूजीच्या  माहिती बुलेटिनमधून कमाल वय निकष काढून टाकण्यास सांगितले आहे. एमबीबीएस , बीडीएस  आणि इतर काही वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट ही भारतातील एकमेव प्रवेश परीक्षा आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा देतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -