Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : मी गल्लीतला भाई… महिन्याला पाच हजारांचा हप्ता द्यावाच लागेल

Kolhapur : मी गल्लीतला भाई… महिन्याला पाच हजारांचा हप्ता द्यावाच लागेल

पोलिसांत तक्रार दिल्याने काय फरक पडणार… मी तर गल्लीतला भाई… महिन्याला पाच हजारांचा हप्ता द्यावाच लागेल; अन्यथा कनाननगरात राहू देणार नाही, अशी धमकी देत मोपेडची तोडफोड करून महिलेवर दहशत माजविणार्‍या भोल्या लमवेल सकटेसह त्याच्या तिघा साथीदारांविरुद्ध कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला.

भोल्या सकटेसह साथीदार सोन्या सकटे, किरण सकटे, गदर सकटे (तिघेही रा. कनाननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयितांना रात्री उशिरापर्यंत अटक झालेली नव्हती. तक्रारदार महिला कुटुंबीयांसमवेत कनाननगर परिसरात राहते. दोन दिवसांपूर्वी महिलेच्या मोपेडची अज्ञाताने दगड मारून तोडफोड केली होती. महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

महिलेने फिर्याद दिल्याने संतापलेल्या चौघांनी महिलेच्या घरासमोर जाऊन आरडा-ओरड करून दहशत माजवून घरात घुसून संसारोपयोगी साहित्याची नासधूस केली होती. आमच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करतेस काय? अशी विचारणा करून प्रसंगी जीवे मारण्याची धमकीही दिली.

‘मी गल्लीतला भाई आहे, महिन्याला पाच हजारांचा हप्ता द्यावा लागेल; अन्यथा कनाननगरात राहू देणार नाही. ठार मारून टाकेन,’ अशीही संशयितांनी धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारानंतर संशयितांनी घरासमोर लावलेल्या मोपेडची पुन्हा तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे कोल्हापूर पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक योगेश पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -