सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण दिसून आली. या घसरणीसह सोने 53 हजारांच्या खाली आले तर चांदी 70 हजारांच्या खाली आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम या किंमतींवर दिसून आला. गेल्या काही दिवसांच्या कमजोरीनंतर रुपया ही मजबूत झाला आहे. रशिया-युक्रेन संकटामुळे सोन्याच्या किंमती झरझर वाढल्या होत्या. त्यात कमालीची वाढ नोंदवण्यात आली होती. वायदे बाजारात सोने 19 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर अर्थात 55,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. मात्र रशिया-युक्रेनमधील तणाव काही अंशी निवाळल्याने सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या. युक्रेनने नाटोचे सदस्यत्व घेण्यास नकार दिल्याने रशियाचा आक्रमकपणा कमी झाला आहे. त्याचा थेट परिणाम दिसून आला. अनेक देशातील शेअर बाजार या भूमिकेमुळे ब-याच प्रमाणात सावरला.
एचडीएफसी सिक्योरीटीज् नुसार, सोन्यात 992 रुपयांची घसरण आली. सोने 52,635 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरावर पोहचले. गेल्या व्यापारी सत्रात सोने 53,627 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर दुसरीकडे चांदीची चमक ही फिक्की पडली. चांदीच्या किंमतीत ही घसरण दिसून आली. चांदी 1,949 रुपयांनी घसरली. चांदी 69,458 रुपये प्रति किलो दरावर येऊन पोहचली. गेल्या व्यापारी सत्रात चांदीचे भाव 71,407 रुपये प्रति किलो इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरणीसह 1,983 डॉलर प्रति औस होते. तर चांदीची किंमती 25.50 डॉलर प्रति औस होती. रशिया-युक्रेन युद्धानंतर सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी तेजी दिसून आली होती. सोने 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.
एचडीएफसी सिक्योरिटीज चे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या मतानुसार, रशिया-युक्रेन संघर्षामुळे किंमती वाढल्या होत्या. आता तणाव निवळल्याने तसेच कुटनिती यशस्वी ठरत असल्याने बुधवारपासून सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. तर मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष(कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी यांच्या मतानुसार, मागील सत्रात उच्चांकी पातळीवर पोहचलेले सोन्याचे दर त्याच वेगाने खाली ही आले. त्यांनी ही दोन्ही देशातील कुटनिती यशस्वी होत असल्याने किंमती घसरल्याचे सांगितले.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जग तिस-या युद्धाच्या छायेत जात असल्याचे संकेत मिळत होते. मात्र नाटोसह मित्र राष्ट्रांनी मोठा हस्तक्षेप टाळल्याने आणि अमेरिकेनेही युद्धात युक्रेनच्या बाजूने सैन्य कारवाई न करण्याची भूमिका घेतल्याने हे युद्ध दोन्ही देशात सिमीत राहिले. त्यातच युक्रेनेच्या राष्ट्रपतींनी नाटोची सदस्यतेत स्वारस्य नसल्याची भूमिका उघडपणे घेतल्याने या दोन्ही देशांतील तणाव काही अंशी निवळला आहे,