गुटखा खाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.काम करताना जोराचा ठसका लागला आणि जागेवर बेशुद्ध झालं. दवाखान्यात नेई पर्यंत तरुणाची प्राणज्योत मालवली ही घटना गुरुवारी संध्याकाळी शहरातील उस्मानपुरा भागात घडली. गणेश जगन्नाथ दास वाग (37, रा. पडमपाणी, रेल्वे स्टेशन परिसर) असे मृताचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत गणेश हा गेल्या 20 वर्षांपासून राहुल साहुजी यांच्या कडे कामाला होता. साहुजी यांच्या घरी डिश टीव्ही बसविण्यासाठी तो गेला होता. तेथे गणेश ने गुटखा खाल्ला होता. दरम्यान काम करीत असताना गणेशला ठसका लागला आणि तो बेशुद्ध पडला.साहुजी यांच्या घरातील सदस्यांनी इतरांच्या मदतीने तातडीने गणेशला घाटी रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तपासून गणेशला मृत घोषित केले.
या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार बि.ए. जाधव करीत आहेत.