ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबईजवळील डोंबिवली रेल्वे स्थानक सध्या चर्चेत आलं आहे. या स्थानकावरील एका किसिंग कपलचा (Kissing Couple of Dombivali) व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण आणि तरुणी एकमेकांना आलिंगन देऊन चुंबन घेताना दिसत आहे.
डोंबिवली आणि सीएसएमटी स्थानकावर हे कपल चुंबन घेताना आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही ठिकाणचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणाऱ्या या जोडप्यावर जीआरपीने (GRP) केस दाखल केली आहे.