ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून १२ ला मतदान तर १६ एप्रिलला मतमोजणी होणार असून उत्तर मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचा पोटनिवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा मतदार संघासाठी १२ एप्रिलला मतदान होणार आहे तर १६ एप्रिलला मतमोजणी होऊन आ । निकाल जाहीर करण्यात येणार डिन । आहे.कोल्हापूर उत्तर विधान संघाची
मतमोजणी; आचारसंहिता लागू
आमदार चंद्रकांत जाधव यांचे दोन डिसेंबरला निधन झाले होते. आम चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. आज निवडणूक आयोगाकडून उत्तर विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकीसाठी
अर्ज भरण्याची मुदत १७ मार्च ते २४ मार्च अशी असून २५ मार्च रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे तर २८ मार्चपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. १६ एप्रिल रोजी मतमोजणी केली जाणार आहे. उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या सार्वत्रिक कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर शहरात पोटनिवडणुकीबाबत चर्चेला सुरुवात झाली मात्र आज निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर शहरात दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना सर्वानुमते बिनविरोध करण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांचे एकमत करून भाजप बरोबर चर्चा करून जाधव यांना बिनविरोध करण्याबाबत नेते मंडळी पाऊल उचलत आहेत. आगामी काळात राजकीय पक्ष काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सीबीआयकडून पोलिस आयुक्त संजय पांडे यांची सहा तास चौकशी त्यानंतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून परमबीर सिंह यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. त्यानंतर, परमबीर सिंह यांनी आपल्याविरुध्दचा तपास मागे घेण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय त्यांनी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय