ताजी बातमी ऑनलाईन टीम
आजकाल यंग कपलमध्ये फोटोशूटची भन्नाट क्रेझ पाहायला मिळते; मग ते प्री-वेडिंग फोटोशूट असो किंवा पोस्ट वेडिंग फोटोशूट. अशाच एका हटके व्हिडीओची सध्या सोशल मीडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये वधू वेगवेगळ्या पोज देत आहे, तर वर शीर्षासनमध्ये दिसत आहे. हे हटके फोटोशूट बघून नेटिझन्सकडून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर अनेक मजेशीर कमेंटही करण्यात येत आहेत.
लग्नापूर्वी आणि लग्नानंतर वधू-वरांचे फोटोशूट करण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. यासाठी फोटोशूटवर अनेकजण हजारो-लाखो रुपये खर्च करतात. यासाठी प्रोफेशनल फोटोग्राफर्स निवडले जातात. स्वत:ला हवे तसे किंवा फोटोग्राफर्स सुचवतील तशा स्टाईल आणि पोजमध्ये हे फोटोशूट केले जाते. असाच एक फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही वाटेल की, आपणही असे फोटाोशूट केले पाहिजे.
३८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये वधू आणि वर फोटोशूटसाठी पोज देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामधील वराची पोज एकदम वेगळी आणि आश्चर्यकारक दिसत आहे. त्याने चक्क शीर्षासन केले आहे. तर वधू मात्र सतत तिच्या पोजेस बदलत आहे. यावरील एका युजर्सने कमेंट केली अआहे की ‘सब झमेला दूल्हे का साथ ही होता है!’ तर दुसऱ्या एका युजर्सने ‘ऐसी हालत तो पति की शादी के बाद होती है’, असे म्हटलं आहे.