Friday, March 14, 2025
HomeसांगलीSangli : प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन कुपवाड मध्ये आत्महत्या

Sangli : प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन कुपवाड मध्ये आत्महत्या

कुपवाड एमआयडीसी जवळील एका खत कंपनीच्या बंद शेडमधील लोखंडी अँगलला एकाच दोरीने गळफास लावून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पांडुरंग दादासो दुधाळ (वय 21, रा. चिंतामणनगर, आरटीओ ऑफिसजवळ, माधवनगर) असे युवकाचे नाव आहे. मुलगी अल्पवयीन आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल नाही.

पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : दुधाळ हा कुपवाड एमआयडीसीमधील एका कंपनीत कामाला होता. या कंपनीच्या परिसरातच संबंधित मुलगी राहत होती. तिचे आई-वडील शेतमजुरी करतात. संबंधित मुलीची व या युवकाची गेल्या काही दिवसांपासून ओळख होती, असे समजते.

कुपवाड एमआयडीसीतील एका खत कंपनीचे शेड गेले काही दिवस बंद होते. सोमवारी संबंधित कंपनीच्या एका कामगाराने शेडचा दरवाजा उघडला असता दुधाळ व एक अल्पवयीन मुलगी या दोघांनी एकाच नॉयलॉन दोरीने लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिस व आयुष हेल्पलाईन टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर हेल्पलाईन टीमने दोन्ही मृतदेह खाली काढले. उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलविले. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसांत झाली आहे. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -