Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगआता गाडीवर ‘पोलीस’ लिहिणं पडणार महागात.

आता गाडीवर ‘पोलीस’ लिहिणं पडणार महागात.

ताजी बातमी ऑनलाइन टीम

आता गाडीवर ‘पोलीस (Police) लिहिणं महागात पडणार असल्याचं पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. काही पोलिस अधिकारी, अमंलदार आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलिस’ अशी लाल रंगाची पाटी लावून वाहन चालवितात. यासंदर्भात उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून कारवाईचे निर्देश दिले आहेत.


जिल्ह्यात यापूर्वी ‘पोलिस’ यासह प्रेस आणि आर्मी लिहलेल्या वाहनांवरही कारवाई सुरू आहे. ती आता अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. सर्व नागरीकांना समान कायदा या तत्वानुसार पोलीसांनीच कायदयाचे उल्लंघन करणे हे पोलीसांची प्रतिमा मलीन करण्यासारखे आहे.

अशा प्रकारे ‘पोलीस’ पाटी लावलेली वाहने नाकाबंदी तसेच सुरक्षा तपासणी न करता पुढे सोडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलीस पाटीचा गैरउपयोग होऊन नागरिकांच्या जीवाला धोका होवू शकतो. तसेच ‘पोलीस’ पाटी लावून अशा प्रकारच्या वाहनांमार्फत घातपात कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी किंवा पोलीसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स काढून टाकावित. यापुढे अशाप्रकारची पोलीस पाटी किंवा पोलीसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स लावल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रेस आर्मी लिहलेल्या वाहनांचीही तपासणी करून नियमबाह्य वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -