Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनसनी लिओनी मराठी चित्रपट 'आमदार निवास'मधील शांताबाई गाण्यावर थिरकणार!

सनी लिओनी मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मधील शांताबाई गाण्यावर थिरकणार!

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच एका नवीन मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी लिओनी ‘आमदार निवास’ या मराठी चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. ‘शांताबाई’ असं हे गाणं असून सनी या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी सनी लिओनी आमदार निवासमध्ये दिसली होती त्यावेळी जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. सनी लिओनीचे हे गाणं पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

बालिवूडसह इतर भाषांमधील अनेक चित्रपटातील गाण्यावर दमदार डान्स केल्यानंतर सनी लिओनीने आपला मोर्चा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळवला आहे. सनीने आतापर्यंत हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटातील गाण्यांवर जबदस्त डान्स केले आहेत. आता ती मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मधील शांताबाई हे आयटम साँग करताना दिसणार आहे. यापूर्वी देखील सनी लिओनीने ‘बॉईज’ या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

दरम्यान, सनी लियोनी लवकरच संजीव कुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मध्ये ‘शांताबाई’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटातील गाण्याच्या माध्यमातून सनी लिओनी आधुनिक शांताबाईचा आवतार दाखवताना दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवा यांनी या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांचं मूळ गीत असलेले हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर दिली आहे. सनी लिओनीचे चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘आमदार निवास’ हा चित्रपट सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा ‘आमदार निवास’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -