आर्मी पोस्टल सर्विस विंग, ब्रिगेड ऑफ द गार्ड्सने गट क पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार अधिसूचनेच्या तारखेपासून 3 आठवड्यांच्या आत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीद्वारे, वॉशर मॅनच्या 1 पद आणि गार्डनरच्या 1 पदांची नियुक्ती केली जाईल.
शैक्षणिक पात्रता
आर्मी पोस्टल सर्विस विंगमधील या ग्रुप सी पदांसाठी भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
या भरती अंतर्गत या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्ष असणं आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार, ओबीसी उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत 3 वर्षांची विशेष सूट असेल.
अर्जाची शेवटची तारीख
१३ एप्रिल २०२२ आहे.
निवड प्रक्रिया
वॉशर मॅन आणि गार्डनरच्या पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे केली जाईल. उमेदवार अधिक तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विंग कमांडर, एपीएस विंग, ब्रिगेड ऑफ गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कॅम्पटी, जिल्हा – नागपूर, महाराष्ट्र – 441001 येथे पाठवावे.
भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होऊन देशाचे संरक्षण करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२२ पासून भारतीय सैन्यदलामध्ये टेक्निकल कॉर्प्समध्ये पुरुषांसह महिलांची देखील भरती होणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर केले असून इच्छूक आणि पात्र महिला ऑफिशिअल भरती पोर्टल, joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज पाठवू शकता.
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)