सांगली जिल्हातील जत शहरापासून शेगाव रोडवर स्कारपीओ गाडी पलटी झाली. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. किरण रामराव शिंदे (वय.३५) (रा. शेगाव) अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील शेगाव येथील किरण शिंदे-पाटील व त्यांचे विटा येथील मित्र सोमनाथ बिचुकले हे शुक्रवारी त्यांच्या स्कारपीओ गाडीने जतहून शेगावला निघाले होते. शहरापासून जवळच असलेल्या सिद्धार्थ पॉलटेक्निक कॉलेजजवळ गाडीचा ताबा सुटल्याने त्यांची गाडी तीन वेळा पलटी झाली. या अपघातात किरण शिंदे- पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे मित्र सोमनाथ बिचुकले हे गंभीर जखमी झाले. जखमी बिचुकले यांना सांगली येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
मयत किरण शिंदे- पाटील हे शेगावचे माजी सरपंच रवी शिंदे- पाटील यांचे बंधू आहेत. त्यांच्या या अपघाती मृत्यूने शेगावसह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.