बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँक ऑफ बडोदाने (BOB) फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, MSME आणि कॉर्पोरेट क्रेडिट विभागांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती परीक्षेत सहभागी होण्याची इच्छा असलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीसंदर्भातील अधिकृत अधिसूचना वाचावी असा सल्ला देण्यात येतो. हे लक्षात घ्या की अर्ज करण्याची प्रक्रिया 4 मार्चपासून सुरू झाली आहे.
ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे ते थेट या लिंकवर https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-specialist-officers-in-bank-of-baroda क्लिक करून आपला अर्ज दाखल करू शकतात. तसेच उमेदवार थेट या लिंकवर https://www.bankofbaroda.in/-/media/Project/BOB/CountryWebsites/India/Career/advertisement-frm-msme-cic-04-01.pdf क्लिक करून भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
महत्त्वपूर्ण तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु झालेली तारीख – 04 मार्च 2022
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 24 मार्च 2022
रिक्त पदांचा तपशील
क्रेडिट ऑफिसर (एमएसएमई विभाग) एमएमजी/एस III – 25 पदे
व्यवस्थापक/डिजिटल फ्रॉड (फसवणूक जोखीम व्यवस्थापन) – 15 पदे
क्रेडिट ऑफिसर (एमएसएमई विभाग) एसएमजी/ एस IV – 15 पदे
परकीय चलन/अधिग्रहण आणि संबंध व्यवस्थापक (कॉर्पोरेट क्रेडिट विभाग) MMG/SIII – 15 पदे
परकीय चलन/अधिग्रहण आणि संबंध व्यवस्थापक (कॉर्पोरेट क्रेडिट विभाग) MMG/SII – 15 पदे
क्रेडिट/निर्यात/आयात व्यवसाय (MSME विभाग) MMG/SIII – 12 पदे
क्रेडिट/निर्यात/आयात व्यवसाय (MSME विभाग) SMG/SIV – 8 पदे
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)