देशभरात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत मोठी घट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अशातच नागरिकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ‘डेल्टाक्रॉन’ची देशात एन्ट्री झाली आहे. नवा व्हेरिएंट हा डेल्टा आणि ओमिक्रॉनचे मिश्रण असल्याचे बोलले जात आहे. देशातील 7 राज्यांत डेल्टाक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. त्यात कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि नवी दिल्लीचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे कर्नाटकात सर्वाधिक 221 रुग्ण आढळल्याची माहिती मिळाली आहे.
रिपोर्ट्सनुसार, देशात 568 नमुन्याची तपासणी केली जात असल्याचे माहिती कोविड जेनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) आणि GSAID ने दिली आहे. नवा व्हेरिएंट डेल्टाक्रॉनचा हॉटस्पॉट बनलेल्या कर्नाटक राज्यात सर्वाधिक 221 रुग्ण आढळले आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये 90, महाराष्ट्रात 66, गुजरातमध्ये 33, पश्चिम बंगालमध्ये 32 आणि तेलंगणात 25 आणि नवी दिल्लीत 20 रुग्ण आढळून आले आहे.
डेल्टाक्रॉन हा कोरोना व्हायरसचा एक सुपर सुपर-म्युटंट व्हायरस आहे. BA.1 + B.1.617.2 असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनचा बनलेला एक संकरित स्ट्रेन आहे. गेल्या महिन्यात सायप्रसमधील संशोधकांना तो पहिल्यांदा आढळून आला होता. प्रयोगशाळेतील ही एक तांत्रिक चूक असल्याचा अंदाज आधी शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. परंतु ब्रिटनमध्येमध्ये डेल्टाक्रॉनच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झालेच्या दिसून आले. त्यानंतर डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट असल्याचे स्पष्ट झाले आहे. डेल्टाक्रॉन हा कोरोना विषाणूचा एक संकरित प्रकार आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनचे तो मिश्रण आहे.
दुसरीकडे, केंद्र सरकारने कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत महत्त्वाची माहिती देत गंभीर इशारा दिला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. ऑमिक्रॉन व्हेरिएंट अजून भारतातून गेलेला नाही, काळजी घ्या, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, आज, भारताने जगातील इतर देशांच्या तुलनेत ऑमियक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार चांगल्याप्रकारे रोखला आहे. आज जगभरात 15-17 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तर भारतात दररोज कोरोनाच्या प्रकरणांचा आकडा 3000 पेक्षा कमी नोंदवला जात आहे.




