Monday, July 7, 2025
HomeसांगलीSangli : वृद्ध जन्मदात्या बापाचा मुलाकडून खून, संशयित आरोपी मुलास अटक

Sangli : वृद्ध जन्मदात्या बापाचा मुलाकडून खून, संशयित आरोपी मुलास अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोनलगी तेथे एका वृद्धाचा किरकोळ कारणातून मुलानेच खून केल्याची घटना घडली आहे. जन्मदात्या बापाचा खून मुलानेच केल्यानेच हळहळ व्यक्त होत आहे. खून झालेल्या वृद्धाचे नाव शिवाप्पा चंद्राम पुजारी (वय ७०) असे आहे. ही घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी मल्लिकार्जुन शिवाप्पा पुजारी (३२) यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवाप्पा पुजारी यांना दारूचे व्यसन होते. बुधवारी रात्री शिवाप्पा पुजारी हे दारू पिऊन आले होते. मुलगा मल्लिकार्जुन व वडील शिवाप्पा यांच्यात वाद झाला. हा वाद मिटवण्याचा गावातील काही मध्यस्थीची प्रयत्न केले. दोघेही दारू पिल्याने ते कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते


रात्रभर हा दोघात वाद सुरू होता शेवटी मुलगा मल्लिकार्जुन यांनी वडिलाला धक्काबुक्की केली यात वडील शिवाप्पा घराच्या बाजूच्या असलेल्या पत्र्यावर पडले. यातच शिवापा यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट दिली. नवले यांनी कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत सदरचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -