बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटला आला. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी तितकी कमाल केली नाही. कारण सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. प्रेक्षक देखील द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. बच्चन पांडे चित्रपट पाहायला प्रेक्षकांची गर्दी कमी पाहायला मिळत आहे. सर्व प्रेक्षक काश्मीर फाइल्स पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. आपला चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे अक्षय कुमारला खूप दु:ख झाले आहे. त्याने ‘द काश्मीर फाइल्स’मुळे माझा ‘बच्चन पांडे’ चित्रपट फ्लॉप झाला असल्याचे देखील बोलून दाखवले आहे.
बॉलीवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे बच्चन पांडे हा चित्रपट फ्लॉप झाल्याचा टोमणा मारला आहे. अक्षय कुमार म्हणाला की, ‘लोकांना विवेक रंजन अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ इतका आवडला की माझा चित्रपट बुडाला.’ भोपाळ येथे आयोजित चित्र भारती चित्रपट महोत्सवात अक्षय कुमार बोलत होता. यावेळी या व्यासपीठावर ‘द काश्मीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री देखील उपस्थित होते.