अनैतिक संबंधाच्या संशयावरुन हातकणंगले येथील दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. पती विजय सुरेश शेंडगे (वय २८) याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. पत्नी अश्विनीने नस कापून घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे.
विजय व अश्विनीचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला; मात्र दोघांचाही एकमेकांवर अनैतिक संबंधातून संशय होता. वाद झाल्यानंतर अश्विनी दोन दिवसांपूर्वी माहेरी इचलकरंजीला गेली होती. ती आल्यापासून फोनवर बिझी होती. रात्री साडेआठच्या सुमारास विजय घरी गेला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पाठोपाठ अश्विनीही घरी गेली. विजयने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यावर तिनेही नस कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात पाठवले. यावेळी डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले, तर अश्विनीवर उपचार सुरु आहेत