शरीरामध्ये व्हिटामिन डी असणे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. व्हिटामिन डीची कमतरता जर आपल्या शरीरासामध्ये झाली तर अनेक प्रकारचे आजार आपल्याला होण्याची शक्यता असते. यासाठी आपल्या शरीराला कधीही व्हिटामिन डीची कमतरता भासू देऊ नका. आपल्या शरीराला व्हिटामिन डी मुख्य: सुर्यप्रकाशामुळे मिळते. यासाठी दररोज सकाळी साधारण 6.30 ते 8 पर्यंत उन्हात बसायला हवे. यामध्ये शरीराला आवश्यक असलेले व्हिटामिन डी मिळते. मात्र, आपण आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करून देखील आपल्या शरीरातील व्हिटामिन डीची कमतरता पूर्ण करू शकतो. हे पदार्थ नेमके कोणते याबद्दल जाणून घेऊयात.
संत्र्याचा ज्यूस
शरीरामधील व्हिटामिन डीची ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या आहारामध्ये संत्र्याच्या ज्यूसचा समावेश करा. यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटामिन डीची नक्कीच मिळेल. तसेच संत्र्याचा ज्यूस आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करतो.
गाजराचा रस
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, गाजर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजराच्या मदतीने आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. शरीरातील व्हिटामिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण गाजराच्या रसाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये देखील समावेश करू शकताो.
गायीचे दूध
गायीचे दूध केवळ व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत नाही तर त्यात कॅल्शियम देखील भरपूर असते. गायीच्या दूधामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. गायीचे दूध प्यायल्याने त्वचा आणि केस निरोगी राहतात. जर तुम्हाला कच्चे दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही दूध स्मूदी बनवू शकता.
दही किंवा ताक
दही आणि ताक यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. लस्सी किंवा रायता याचा देखील आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो. दही आणि ताकमुळे आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण होते. उन्हाळ्यात दही शरीराला थंड ठेवते. यामुळे अनेक आजार टाळता येतात. दह्याचा आहारात समावेश करा.
सोयाबीन दुध
सोया मिल्कमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. त्यात कॅल्शियम आणि लोह देखील भरपूर आहे. हे पेय हाडे मजबूत करण्यास मदत करते. शाकाहारींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. आपल्या दररोजच्या आहारामध्ये सोयाबीनच्या दुधाचा नक्की समावेश करा.