Sunday, December 22, 2024
HomeसांगलीSangli : गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आटपाडी महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

Sangli : गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आटपाडी महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

वाढत्या महागाईनं सर्वसामान्य जनता होरपळून निघत असतानाच, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सामान्यांच्या त्रासात पुन्हा भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीविरोधात आटपाडी तालुका महिला राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत वाढत असताना, केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांनी रशियासोबत करार करून तीन दशलक्ष बॅरल कच्चे तेल अतिशय माफक दरात आयात केले. या आयातीमुळे अमेरिकेने टाकलेल्या आर्थिक निर्बंधांचे कुठेही उल्लंघन झाले नाही. असे असताना सुद्धा आता कच्च्या तेलाच्या वाढीव किंमतीचा दाखला देऊन घरगुती गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय?

ज्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत न्यूनतम होती, तेव्हा देखील मोदी सरकारने स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी केले नाहीत आणि आता वाढीव किंमत आहे, असे सांगून मोदी सरकार घरगुती गॅस व इतर इंधन दरवाढ करत आहे, हे योग्य नाही, याच्या निषेधार्थ आटपाडी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने या वाढत्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -