Tuesday, July 29, 2025
HomeसांगलीSangli Crime : सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर

Sangli Crime : सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगलीच्या इस्लामपूर पोलीस स्टेशनच पोलीस रात्री गस्तीला असणाऱ्या पथकाच्या सतर्कतेमुळे अवघ्या एका तासात ट्रॅक्टरसह चोरट्यास जेरबंद (Arrest) करण्यात आले आहे. सदरच्या ट्रॅक्टरचा पाटलागकरत पोलिसांनी हा ट्रॅक्टर पकडला आहे. अक्षय अशोक गोरवे (26) असे ट्रॅक्टर चोरणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता ट्रॅक्टर चोरुन आणल्याची त्याने कबुली दिली. पोलिस अधिक्षक दिक्षित कुमार गेडाम साहेब, अपर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले मॅडम यांनी चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे इस्लामपूर पोलिसांनी रात्र गस्तीला हत्यारबंद पोलिस पथके नेमली आहेत.


गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाठलाग करुन ट्रॅक्टर पकडला
इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीत रात्रगस्त करताना पहाटे 2 वाजता ताकारी गावात फिर्यादी अभिजीत चंद्रकांत मोरे राहणार रेठरेहरणाक्ष यांच्या ताकारी गावातील मित्राच्या पत्र्याचे शेडमध्ये 80 हजार रुपये किमतीचा एक पावर ट्रक कंपनीचा निळा रंगाचा ट्रॅक्टर हा त्यांनी एक तासापूर्वी लावलेला होता. तरी तो दिसून येत नसल्याने चोरीस गेला असल्याबाबत रात्री पोलिसांना सांगितले. गस्तीला ताकारी येथे गेलेले पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करून शोध सुरू केला. तर इस्लामपूर शहर हद्दीत बोरगाव ते जुनेखेड जाणाऱ्या रोडवर जुनेखेड गावच्या दिशेने एक भरधाव वेगाने ट्रॅक्‍टर गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी लागलीच सदरच्या ट्रॅक्टरचा चित्तथरारक पाठलाग करून सदर ट्रॅक्टर थांबवला. सदर ट्रॅक्टरबाबत विचारणा केली असता त्याने ट्रॅक्टर चोरून आणल्याची कबुली दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -