ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आलिया RRR चे डायरेक्टर एसएस राजामौली यांच्यावर नाराज असल्याचं ऐकायला मिळतंय. तिने इंस्टाग्रामवरून राजामौलींना अनफॉलो केल्याचे वृत्त असून इन्स्टा अकाउंटवरून RRR शी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्याचे समजते आहे.
राजामौलींवर आलिया नाराज?
रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट डायरेक्टर राजमौली यांच्यावर नाराज आहे. RRR च्या फायनल कटमध्ये कमी स्क्रीन स्पेस मिळाल्याने आलिया अस्वस्थ झाली आहे. आलिया भट्ट RRR मधील तिची छोटीशी भूमिका पाहून नाखूष आहे, म्हणून तिने इन्स्टाग्राम (Instagram) वरील चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट हटवल्या आहेत. तर तिने RRR डायरेक्टर राजामौली यांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले असल्याचीही चर्चा रंगली आहे. मात्र यात तथ्य नाही.
आलिया भट्टने राजामौलींना अनफॉलो केलेले नाही. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाऊन तुम्ही चेक केला तर आलियाच्या फॉलोईंगमधील यादीत एसएस राजामौली यांचे नाव स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे राजामौली यांना अनफॉलो केल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. पण हो, हे खरे आहे की आलिया भट्टच्या इन्स्टा अकाऊंटवर आरआरआरशी संबंधित कोणत्याही पोस्ट नाहीत. आता आलियाने या पोस्ट का डिलीट केल्या याचे खरे कारण गुलदस्त्यातच आहे.
RRR मध्ये आलियाला कमी स्क्रीन स्पेस मिळाली आहे हे खरे आहे. तिची सीतेची भूमिका सशक्त नाही. आलियाची उपस्थिती फारशी दिसली नाही. नुकत्याच झालेल्या RRR च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये आलिया फारशी दिसली नाही. आता आलिया खरोखरच राजामौली यांच्यावर नाराज आहे की आणखी काही… कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे खूप घाईचे ठरेल.